चंदगड / प्रतिनिधी :--
सुवर्ण जयंती नगरोथान(जिल्हास्तरीय) योजना व लोकशाहीर आन्नाभाऊ साठे नगरी दलित वस्ती सुधारणा योजना २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेल्या ४५ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ माजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील व आम.राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.
वार्ड क्र २ नवीन वसाहत चंदगड मधील महारथळ शेततळी पासून प्रभाग क्रमांक ७ पर्यंतचा पाणलोट आर सी सी गटर्स बांधकाम करणे ( ३९. लाख )तसेच उस्मान मुल्ला ते दिलीप चंदगडकर घर रस्त्याच्या पश्चिम बाजूस आर सीसी गटर बांधकाम करणे व खडीकरणारसह डांबरीकरण करणे.(६.लाख) मंजूर झाले आहे.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश सदस्य गोपाळराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेस चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई, चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, वार्ड क्र.२चे नगरसेवक दिलीप महादेव चंदगडकर,नेत्रदिपा कांबळे, व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व नगरसेविका व सर्व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment