युवकांनी सायबर क्राईमला बळी पडू नये - ॲड. विठोबा जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2022

युवकांनी सायबर क्राईमला बळी पडू नये - ॲड. विठोबा जाधव



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      एखाद्या व्यक्तीची संगणकावरील खाजगी माहिती त्याच्या परवानगीशिवाय अथवा चोरून सोशल मीडीयामार्फत गैरवापर करणे अथवा ब्लॅकमेल करणे. तसेच सोशल मीडीयामार्फत दाखविल्या जाणा - या अतिरंजित जाहिराती व भूलथापांना बळी पडणे हा सायबर क्राईम असून समाजातील सामान्य जनता व युवक त्यास सहज बळी पडत आहेत, म्हणून याबाबत युवा वर्गाने जागृत राहिले पाहिजे असे विचार प्रतिपादन  विठोबा जाधव यांनी व्यक्त केले. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अ‍ॅन्टी रॅगिंग विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सायबर क्राईम या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील हे होते. ॲड. जाधव पुढे म्हणाले, ``मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमाव्दारे मेसेज पाठवून जाळयात ओढले जाते. फेसबुक - इन्स्टाग्राम मधून जवळीक वाढवून युवक युवतींचा गैरफायदा घेतला जातो. विशिष्ट अॅपव्दारे पर्सनल डाटा चोरी करून हॅकर्स बँक अकौट लुटतात. अशावेळी युवकांनी यापासून कसे दूर राहिले पाहिजे व यात अडकलेल्यांनी सुटकेसाठी काय करायला हवे, या संदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅन्टी रॅगिंग विभाग प्रमुख प्रा. एस. एन. खरूजकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, अॅडव्होकेट व्ही. जी. झाजरी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. ए. बी. पिटुक यांनी मानले.

No comments:

Post a Comment