कोवाड येथे ग्राम स्वराज्य अभियान वार्षिक आराखडा प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2022

कोवाड येथे ग्राम स्वराज्य अभियान वार्षिक आराखडा प्रशिक्षण

कुदनूर गणस्तरीय वार्षिक आराखडा प्रशिक्षण कोवाड येथे मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सोबत मार्गदर्शक चिंतामणी करजगी दत्तात्रय नाईक व जी एल पाटील.


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सन २०२३-२४ वार्षिक आराखडा अंमलबजावणी साठी पंचायत समिती कुदनूर गणस्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण ग्रामपंचायत कोवाड (ता. चंदगड)  येथे पार पडले. दि. १२/१०/२०२२ रोजी ग्रामपंचायत सदस्य व संसाधन गट तर दि. १३ रोजी महिला स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ, आशा, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण पार पडले.

         उपस्थित प्रशिक्षणार्थींना चिंतामणी जी. करजगी (सहाय्यक अभियंता बांधकाम उपविभाग चंदगड) व दत्तात्रय नाईक (ग्रामविकास अधिकारी कालकुंद्री) यांनी स्वच्छता, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, पावसाचे पाणी संकलन, पुनर्भरण व पाण्याचा पुनर्वापर, शिक्षण, उपजीविका, महिला व बालकल्याण, मागासवर्ग कल्याण, प्रशासकीय उपक्रम आमचा गाव आमचा विकास या घटकांवर मार्गदर्शन करून गावांचा विकास साधण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्ग नियोजन व उपस्थिती बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी कोवाडचे ग्राम विकास अधिकारी जी एल पाटील, निलकंठ सांबरेकर यांचेसह कुदनूर गणातील घुल्लेवाडी, जक्कनहट्टी, निटूर, तेऊरवाडी, कोवाड, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी, राजगोळी खुर्द, चन्नेहट्टी, राजगोळी बुद्रुक, यर्तेनहट्टी, तळगुळी, कुदनूर आदी गावातील प्रशिक्षणार्थी हजर होते. कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत व्ही. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment