गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते वनपाल दत्तात्रय पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2022

गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते वनपाल दत्तात्रय पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार प्रदान

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे शुभ हस्ते सत्कार स्वीकारताना पाटणे वनक्षेत्रचे वनपाल दत्तात्रय हरी पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         पाटणे (ता. चंदगड) येथील वनपाल श्री दत्तात्रय हरी पाटील यांना नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन चा आंतरराज्य (महाराष्ट्, कर्नाटक, गोवा) आदर्श सरकारी अधिकारी संवर्गातील पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे शुभ हस्ते धर्मनाथ भवन बेळगाव येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, अभिनंदन पत्र,  सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा व चंदन हार ,असे पुरस्काराचे स्वरूप होते.

         यावेळी श्रीम रत्नमाला सावनुर, माजी केंद्रीय मंत्री, बॅ.  अमरसिंह पाटील माजी खासदार बेळगाव, जिल्हा पोलीस प्रमुख गुलबर्गा, आमदार निलेश लंके विधानसभा सदस्य पारनेर अहमदनगर व विविध कार्यक्षेत्रातील आजी-माजी मान्यवर उपस्थित होते.

          या फाउंडेशन तर्फे वर्दीतील अधिकाऱ्याचा पहिल्यांदाच सन्मान झालेला आहे. यापूर्वी पाटील यांना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ही सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचे वनसेवेचे सुवर्णपदक मिळालेले आहे. 

         श्री. पाटील यांचे मूळ गाव घाटकर वाडी (ता. आजरा) असून वन पतसंस्था कोल्हापूरचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हा वन संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. श्री. पाटील यांनी विविध विषयांवर लेखन व कविता केल्या आहेत. तसेच २५० हून अधिक शाळा, कॉलेजेसमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शनही केलेले आहे. नवनवीन नाविन्यपूर्ण  उपक्रम तसेच सर्व समावेशक कार्यपद्धतीमुळे श्री. पाटील यांचे समाजातील विविध घटक व क्षेत्रामधून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment