![]() |
हेमलता वाघ |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
डुक्करवाडी (रामपूर) (ता. चंदगड) येथील रहिवासी व सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती हेमलता रामनाथ वाघ (वय वर्ष ९९) यांचे पहाटे वृध्दापळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे.
श्रीमती वाघ यानी संकेश्वरमधून शिक्षकी सेवेला सुरुवात केली. भाषावार प्रांत:रचनेनंतर चंदगड तालुक्यातील कन्या शाळा चंदगड, उंबरवाडी, शिरगाव अशा अनेक शाळांमधून अध्यापनाचे कार्य केले. ९ वर्षे डुक्करवाडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सेवा केली. डुक्करवाडी शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. सरकारी गायरान (काटे) येथील शाळेच्या क्रिडांगणाच्या अतिक्रमणाविरुध्द पाठपुरावा केला.
यादरम्यान १९८२ साली त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. कोल्हापूर येथील प्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डाॅ. विनय वाघ यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment