कोवाड महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त भारत कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2022

कोवाड महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त भारत कार्यक्रम संपन्न

महाविद्यालय परिसराची स्वच्छता करताना एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यींनी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्लास्टिक मुक्त भारत या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.

      प्रास्ताविक डॉ. के. एस. काळे यांनी करून कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.त्यानंतर सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक, सेवक, कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृह इमारतीच्या आसपास, ग्रंथालय, क्रिडांगणच्या परिसरात प्लस्टिक, कागदपत्र, पिशव्या, तसेच कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

     यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच आपला देश स्वच्छ आणि सुंदर  ठेवण्यासाठी आवाहन केले. आभार डॉ. दीपक पाटील यांनी केले सूत्रसंचालन डॉ. ए. के. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. के. एस. काळे, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. दीपक पाटील यांनी केले होते. यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी, आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment