चिंचणे येथे रस्त्यावर दगडांचा खच, वाळूसाठी डोंगर पोखरल्याचा परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2022

चिंचणे येथे रस्त्यावर दगडांचा खच, वाळूसाठी डोंगर पोखरल्याचा परिणाम

चिंचणे येथे रस्त्यावर येऊन पडलेला दगडांचा खप

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने चिंचंणे येथे रस्त्यावर दगडांचा खच पडल्याने कोवाड चिंचणे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. वाळू उत्खननासाठी डोंगर उतारावर उत्खनन केल्याने येथील दगड व वाळूमिश्रीत चिखल रस्त्यावर वाहत येऊन खच पडला.

         येथील पांडूरग टोपाना चौगुले यांच्या वाळू उत्खनन जागे जवळून पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आल्याने मोठया प्रमाणात दगड - माती- वाळू रस्त्यावर येऊन पडली. या परिसरात मोठया प्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याने याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना व ग्रामस्थांना होत असल्याच्या तक्रारी आहेत. याचा परिणाम सार्वजनिक विहीरीच्या पाण्यावरही होत आहे. या बरोबरच काही घरानादेखील धोका निर्माण झाला आहे. या सर्वाकडे सरपंच संतोष पाटील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांचा आहे. 

No comments:

Post a Comment