संजय शिंदे यांची नाभिक महामंडळाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2022

संजय शिंदे यांची नाभिक महामंडळाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

संजय शिंदे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी संजय शटुप्पा शिंदे (शिनोळी बुद्रुक, ता. चंदगड) यांची निवड झाली आहे. 

          शिंदे यांचे सामाजिक, संघटनात्मक व परिवर्तनवादी विचारांचे कार्य लक्षात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे, प्रदेश सरचिटणीस दिलीप अनाथे, सहचिटणीस सयाजीराव झुंजार, विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामणे, चंदगड तालुका अध्यक्ष विशाल सकपाळ, मनीषा शिवनगेकर, एम. आर. टीपुगडे, मारुती टिपुगडे,  वैजनाथ शिवणगेकर आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment