हलकर्णी महाविद्यालयात नॅक पुनर्मूल्यांकन विषयावर कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2022

हलकर्णी महाविद्यालयात नॅक पुनर्मूल्यांकन विषयावर कार्यशाळा संपन्नचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व डॉ. घाळी महाविद्यालय आय. क्यू. ए. सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नॅक पुनः र्मूल्यांकन या विषयावर कार्यशाळा हलकर्णी येथे नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे यांनी केले. या कार्यशाळेत प्रा. पी. ए. पाटील, डॉ. अनिल गवळी, डॉ. आय. आर. जरळी, सुधीर गिरी, डॉ. घाळी महाविघालयाचे प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. नॅकला सामोरे जात असताना त्याची पूर्वतयारी कशी करावी, सादरीकरण कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. दौलत विश्वस्थ संस्थेचे जेष्ठ मार्गदशक मा गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील यांचे प्रोत्साहन या कार्य शाळेच्या आयोजना साठी लाभाले. डॉ. घाळी महाविघालयाचे नॅक समन्वयक डॉ. शिवानंद मस्ती यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. जे. जे. व्हटकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment