चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हिंडलगा (ता. जि. बेळगाव) येथील तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी शाखेतर्फे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय संचलित यश स्पोर्ट्स अकॅडमी च्या गोपाळ मारुती भालेकर (बी. ए. १) या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला प्राचार्य बी. डी. अजळकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अर्जुन पिटूक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गोपाळ भालेकर यांचा दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment