मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सरस्वती पुजन उत्साहात ,दांडियाचेही आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2022

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सरस्वती पुजन उत्साहात ,दांडियाचेही आयोजन


चंदगड / प्रतिनिधी :-
 कुभारमाठ मालवण (जि. सिंधुदूर्ग) येथील शासकीय तंत्रनिकेतनमघ्थे दस-या निमित्त विविध शैक्षणिक साहित्याचे शस्त्र पूजन करून भारतीय संस्कृतीची जोपासना केली. प्र. प्राचार्य डॉ संजय चोपडे यांच्याहस्ते सरस्वती पुजन व वह्या, पुस्तके, अभियांत्रिकी विभागातील विविध साहित्याचे पुजन करण्यात आले. प्रारंभी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एन. गोलतकर यानी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी प्राचार्य डॉ. चोपडे यानी भारतामध्ये सण आणि उत्सवांची कमतरता नाही. शिक्षक व विद्यार्थ्यासाठी हिच सर्व साधने शस्त्र आहेत. याचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करण्याचे आवाहन करून भारतीय संस्कृतीत शस्त्र पूजनाचे महत्व स्पष्ट केले.

          यावेळी तंत्रनिकेतन मधील विविध विभागा मध्ये सरस्वती पुजन व शैक्षणिक साहित्य व अवजारे यांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भजन व दांडियाचे आयोजन केले होते. कोरोना महामारीत दोन वर्ष बंद असलेल्या तंत्रनिकेतन मधील दांडियामध्थे विद्यार्थ्यांनी मनमुराद लाभ घेतला. 

यावेळी  प्रा. मकरंद कुलकर्णी, प्रा. दीपक बडेकर, प्रा. स्वाती गोलतकर, प्रा. अपर्णा आवारे, श्री संजय कविटकर, आशिष येवकार, अनिल परसे आदीसह प्राध्यापक, विद्यार्थ्यी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र पेंदाम यांनी मेहनत घेतली.No comments:

Post a Comment