कलाप्रेमी सांस्कृतिक मंडळाकडून तेऊरवाडीत विविध कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2022

कलाप्रेमी सांस्कृतिक मंडळाकडून तेऊरवाडीत विविध कार्यक्रम संपन्न

कलाप्रेमी मंडळाने पुजवलेली दुर्गामाता मूर्ती व गावामध्ये केलेली आकर्षक विद्युत रोषनाई

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
रौप्यमहोत्सव साजरा करण्याऱ्या तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील  कलाप्रेमी, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाकडून गेले नऊ दिवस विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
 सलग २५ वर्षे या मंडळाकडून दुर्गामाता प्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. या वर्षी या मंडळाने संपूर्ण गावामध्ये आकर्षक विद्युत रोषनाई
केली. याबरोबरच नऊ दिवसामध्ये समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी मंडळाने विविध व्याख्याने, कथाकथन' स्पर्धा, आरोग्य शिबिर, हळदी कुंकू, संमोहन अशा हजारो कार्यक्रमांचे यशस्वीरित्या संयोजन केले. समाज प्रबोधन हा उदात्त हेतू ठेवून मंडळ कार्यरत असल्याने मंडळाचा नावलौकिक वाढत चालला आहे. अशा या मंडळाने दुर्गामातेचे मोठया भक्तीभावाने पूजन करून  भव्य मिरवणूक काढून विसर्जन केले.


No comments:

Post a Comment