किल्ले पारगडवर स्वच्छता मोहीम...! नेहरू युवा केंद्र श्रीराम सेनेचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2022

किल्ले पारगडवर स्वच्छता मोहीम...! नेहरू युवा केंद्र श्रीराम सेनेचा सहभाग

किल्ले पारगड स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले नेहरू युवा केंद्र, श्रीराम सेना आदी संघटनांचे स्वयंसेवक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नेहरू युवा केंद्र कोल्हापूर (युवा कार्यक्रम तसेच क्रीडा मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम), श्रीराम सेना हिंदुराष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड वर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, किल्ल्याची तटबंदी, पायऱ्या या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 

          पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात केलेला विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा, बाटल्या इत्यादी जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. तालुका व परिसरातील सुमारे शंभर स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. श्रीराम सेना हिंदुराष्ट्र सेना चे अध्यक्ष महांतेश देसाई यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक अमेय सबनीस गडावर येणाऱ्या पर्यटकांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी इथे कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे; असे आवाहन केले. गडाच्या स्वच्छते मध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल स्वयंसेवकांचे आभार व्यक्त केले. पुढील स्वच्छता मोहीम भव्य स्वरूपात लवकरच आयोजित करणार असल्याचे सबनिस यांनी सांगितले. युवा केंद्राच्या वतीने स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांसाठी जेवणाची सोय करण्यात आली याबद्दल स्वयंसेवकातून समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment