अथर्वचे अध्यक्ष खोराटे यांच्यासह मुलावर जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2022

अथर्वचे अध्यक्ष खोराटे यांच्यासह मुलावर जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखलचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         दौलत-अथर्व कारखान्यात नोकरी करण्याऱ्या गणपत खेमान्ना कांबळे (वय-५३, रा. कोरज, ता. चंदगड) या कर्मचाऱ्याची बदली डिस्टलरी विभागाकडुन सुरक्षा विभागाकडे बदली केल्याबाबत अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी विचारणा केली असता जातीवाचक अपशब्द वापरुन धमकावल्याची  फिर्याद श्री. कांबळे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी शुगर हाऊस जवळ सकाळी ९ वाजता घडला.

     पोलिसातून मिळालेली माहीती अशी की, ``दौलत-अथर्व साखर कारखान्यात गणपत कांबळे हे डिस्टलरी  विभागात नोकरीला आहेत. कांबळे याची बदली त्या विभागाकडुन सुरक्षा विभागाकडे वॉचमन म्हणुन केल्याचे कांबळे यांना समजातच त्याने याबाबत अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना माझी बदली का केला, माझी काय चुकी आहे ते मला सांगा, माझे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले आहे, दोन वर्षांत आपण माझी सातवेळा वेगवेगळया ठिकाणी बदली केला आहे, माझं काय चुकलं ते सांगा असे म्हणताच श्री. खोराटे यांनी जातीवाचक अपशब्द वापरुन तुला बदली केलेल्या ठिकाणी जावे लागेल. नाहीतर नोकरीवरुन काढुन टाकीन असे सुनावले. त्यावेळी पुन्हा फिर्यादी कांबळे यांनी साहेब माझी काय चुकी आहे ते तरी सांगा असे परत म्हटले. त्यावेळी तेथे श्री. खोराटे यांचे सुपुत्र पृथ्वी खोराटे यांनी जातीवाचक अपशब्द वापरुन तुला चेअरमन साहेबांनी सांगितलेलं समजत नाही का असे म्हणुन गणपत कांबळे यांच्या अंगावर धावून गेले व गेटच्या बाहेर निघुन जा, असे बोलून जातीवाचक अपशब्द करून त्याचा अपमान केला. 

         याबाबतची फिर्याद गणपत कांबळे यांनी चंदगड पोलीसात दिली असुन खोराटे पिता पुत्रावर भा. द. वि. स कलम ३५२, ५०६, ३४ अ. जा. अ. ज. अत्याचार प्रतिबंध सन १९८९ चे कलम ६ तसेच सन १९८९ चा सुधारीत अध्यादेश सन २०१५ चे कलम ३ [१][r], [S], ३[२][va] प्रमाणे तक्रार दाखल झाली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत.

No comments:

Post a Comment