चंदगड अर्बन बँकेच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व चेअरमन दयानंद काणेकर यांची प्रमुख उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2022

चंदगड अर्बन बँकेच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व चेअरमन दयानंद काणेकर यांची प्रमुख उपस्थिती

चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, शेजारी चेअरमन दयानंद काणेकर, नगराध्यक्ष प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सचिन बल्लाळ, अरुण पिळणकर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

                येथील चंदगड अर्बन बँकेच्या वतीने भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (ता. २७) माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांच्या हस्ते झाले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धेला सुरवात झाली. 

           यावेळी बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर म्हणाले, ``मोबाईलमध्ये अडकून पडलेल्या तरुणाईला खेळातून आरोग्यदायी बनविणे. तसेच चंदगड सारख्या शहरात खेळाला प्राध्यान्य द्यावे. तरुणाईची मोबाईलपासून काही वेळ का असेना विसर पडावा व खेळाचे महत्व तरुणाईला समजावे. या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.``

      यावेळी व्हाईस चेअरमन बाबू हळदणकर, अरुण पिळणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, श्री. देशमुख, नगराध्यक्ष प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेविका अनिता परीट, माधुरी कुंभार, नेत्रा कांबळे, राजेंद्र परीट, बाबुराव हळदणकर, दिलावर सय्यद, झाकीर नाईक, सीओआर चौगुले, मॅनेजर नौशाद मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

                                 

No comments:

Post a Comment