डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या "सृजनगंध" ग्रथास संत नामदेव राष्ट्रीय संशोधन साहित्य पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2022

डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या "सृजनगंध" ग्रथास संत नामदेव राष्ट्रीय संशोधन साहित्य पुरस्कार

 

डॉ. चंद्रकांत पोतदार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठीचे प्रा. कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या 'सृजंनगंध' या बहीणाबाई चौधरी यांच्या कवितेच्यां समग्र समीक्षा ग्रंथास हिंगोली येथील समृध्दी प्रकाशनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या ग्रंथ पुरस्कारमध्ये 'संत नामदेव राष्ट्रीय संशोधन साहित्य' पुरस्कार जाहीर झाला.या पुरस्कार निवडीचे  नुकतेच संयोजक डॉ. श्रीराम क्रहाले यांनी कळविले.

        डॉ. पोतदार यांचे कविता संग्रह, समीक्षा, संपादने अशी अनेक प्रकारची ग्रंथ संपदा प्रसिद्ध असून या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.याशिवाय  नुकतीच त्यांची  अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर येथील संत नरहरी सोनार अध्यासन  कोअर कमिटी सदस्य पदीही निवड  झाली आहे. या यशाबद्दल  दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment