लोकमान्य गणरंग चित्रकला स्पर्धेत केंद्र शाळेचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2022

लोकमान्य गणरंग चित्रकला स्पर्धेत केंद्र शाळेचे यश

गणरंग चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करताना लोकमान्य पतसंस्थेचे अधिकारी, मुख्याध्यापक व अध्यापक.

कोवाड: सी. एल. वृत्तसेवा
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त आयोजित 'गणरंग चित्रकला स्पर्धा २०२२' मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाडच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. गणेशोत्सव निमित्त शाळेत  वयोगट ६ ते १० वर्षे मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील प्रत्येक इयत्तेतील प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांनी गणरंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना 'लोकमान्य' च्या वतीने बक्षीसे व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 
   मुख्याध्यापक श्रीकांत व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य चे शाखा  व्यवस्थापक गोविंद दंडगे, सहाय्यक व्यवस्थापक रमेश देसाई यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. स्वागत मुख्याध्यापक यांनी केले. प्रास्ताविक कविता पाटील यांनी केले. यावेळी कॅशियर जोतिबा गावडे, स्मिता मोहनगेकर, अरुण रेडेकर, अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, मधुमती गावस, उज्वला नेसरकर यांची उपस्थिती होती, सूत्रसंचालन गणपती लोहार यांनी केले. भावना अतवाडकर यांनी आभार मानले. यावेळी लक्ष्मी सुतार, अर्चना पाटील यांनी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामा यादव व समितीचे प्रोत्साहन लाभले.No comments:

Post a Comment