टक्केवारी मुळे तालुक्यातील विकासकामे दर्जाहीन -- भाजपाचे शिवाजी पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2022

टक्केवारी मुळे तालुक्यातील विकासकामे दर्जाहीन -- भाजपाचे शिवाजी पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर मध्ये चंदगड तालुक्यातील विकास कामांचा शुभारंभ 

चंदगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवाजीराव पाटील, शेजारी भरमूअण्णा पाटील, नामदेव पाटील, लक्ष्मण गावडे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे मागील काळात काही करता आले नाही. आता राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे दोन-तीन महिन्यात चंदगड तालुक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगून स्टंटबाजी आणि दिखावेगिरीने प्रश्न सुटत नसतात. सत्ता असताना कोणतेही प्रश्न सुटल्याचे दिसले नाहीत, आता केवळ प्रसिद्धीसाठी काही लोकप्रतिनिधी काम करण्याचा दिखावा करत असल्याचा टोला भाजप राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी पाटील यांनी  लगावला. चंदगड येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

              प्रारंभी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील प्रास्ताविक यांनी करून पत्रकार परिषदेचा हेतू स्पष्ट केला.श्री.पाटील पुढे म्हणाले कि विकासकामांसह सर्वच कामं ही मंत्रालयातून होतात आणि तेथून कामं आणण्याची आपली  ताकद आहे. त्यामुळे पुढील काळात तालुक्यात आरोग्य, रस्ते, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात काम झालेलं तुम्हाला दिसेल.  महिलाना होणार्‍या कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे योग्य वेळी निदान व्हावे यासाठी कॅन्सर तपासणी मशीन तालुक्यात बसवली जाणार आहे. तसेच विविध भागात कॅम्प घेवून महिला कॅन्सर शिबीर राबविली राबविली जातील,यातून तालुक्यातील महिलांना दिलासा मिळेल,असे सांगुन तालुक्यात सर्व सोयीनीयुक्त असे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे प्रयत्न सूरू असल्याचे श्री.पाटील यांनी सांगुन ते पुढे म्हणाले. टक्केवारीमुळे तालुक्यात होत असलेल्या  विकासकामात खोडा येत आहे.तालुक्यातील अनेक विकासकामे ही टक्केवारीमुळेच रखडली आहेत.दर्जाहिन रस्त्याची कामे होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत.टक्केवारीच्या लोभापायी  कामे बाहेरील कंत्राटदारांनाच दिली गेली आहेत, तालुक्यात सक्षम कंत्राटदार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या सर्व प्रश्नांची आणि ठेकेदारांची चौकशीची मागणी करणार असल्याचे शिवाजी पाटील यांनी सांगितले. 

यावेळी माजीमंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, अनेक प्रश्न हे आम्ही मार्गी लावले. मात्र, विरोधकांनी केवळ प्रसिध्दी आणि स्टंटबाजी करून श्रेय लाटण्याचे काम केले आहे. हेरे सरंजामसारखा प्रश्न मिटवण्यासाठी १९९७ सालापासून तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह आम्ही प्रयत्न केले. शिवाजी पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महसुलमंत्री यांच्याकडे प्रयत्न केले. मात्र, शेवटच्या क्षणी केवळ लोकांना हाताशी धरून या प्रश्नाला वेगळे वळण देण्यात आले. तरी देखील हा प्रश्न कायमचा आम्हीच सोडवू आणि तो तडीस लावल्याशिवाय सोडणार नाही असे  सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील,माजी जि.प.सदस्य सचिन बल्लाळ,उदयकूमार देशपांडे,सरपंच आर.जी.पाटील, अनिल शिवनगेकर, युवा जिल्हा उपाध्थक्ष अकुंश गवस,रवि बांदिवडेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:

Post a Comment