हेरेसरंजाम प्रकरणी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मागे आम.राजेश पाटील यांचा पुढाकार,१९ ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2022

हेरेसरंजाम प्रकरणी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मागे आम.राजेश पाटील यांचा पुढाकार,१९ ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

  

आमदार राजेश पाटील यांच्या कडून सरबत घेऊन उपोषण सोडताना आंदोलनकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
हेरे सरजांम प्रकरणी चंदगड तालुक्यातील ५५ गावातील हेरेसरंजाम जमिनी भोगवटदार वर्ग २ च्या भोगवटदार वर्ग १ होऊन मिळणेबाबत सन १९६२ साली सरंजामशाही वतन खालसा करणेचा आदेश झाला.पण प्रशासनाच्या लालफितीत अडकलेल्या गलथान कारभारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रांतकार्यालयातील मुस्कटदाबी विरोधात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवार दि.१०ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.मंगळवार ११रोजी आम.राजेश पाटील यांनी अंदोलन स्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली.भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी  वर्ग १ करण्याची प्रक्रिया सुलभ करणे व इतर विषयांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी अंदोलन मागे घेतले.आम.पाटील यांच्या हस्ते अंदोलकाना लिंबु सरबत देण्यात आले.यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे उपस्थित होते.
         चंदगड तालुक्यातील बर्‍याच गावातील जमिनी वर्ग २ चे वर्ग १ करण्यात आल्या ,परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि गलथान कारभारामुळे उर्वरीत ५५ गावांचा हेरेसरंजाम भोगावटदार वर्ग २ हा शेरा अध्याप ७/१२ कोष्टकी आहे तसा आहे . याला संपूर्ण जबाबदार प्रशासनच आहे.हेरे सरजांम प्रकरणातील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करव्यात यासाठीचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात पाठवले जायचे मात्र तेथील कर्मचाऱ्यांकडून काहीतरी त्रुटी काढून ते परत पाठवले जायचे.दोन-दोन वर्ष शेतकर्याना चक्करा माराव्या लागल्या.त्यामुळे वैतागून अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
      अंदोलन स्थळी माजी मंत्री भरमुअण्णा पाटील,नगराध्यक्षा सौ.प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,माजी जि.प सदस्य सचिन बल्लाळ,राजेंद्र परीट,ताम्रपर्णीचे अध्यक्ष विक्रम पाटील, चंदगड नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यानी भेट देऊन या अंदोलनाला पाठींबा दिला.
         महादेव मंडलीक - पाटील , अनिल रेंगडे , धोंडीबा चिमणे , राजू कापशे , राजाराम वाईंगडे या अंदोलक शेतकऱ्यांनी हेरेसरंजाम प्रकरणी झालेल्या आदेशानुसार प्रलंबीत प्रकरणे निर्गत करणे,प्रांत कार्यालय व चंदगड तहसील कार्यालयात ज्या कर्मचाऱ्यांना तीन वर्ष पुर्ण झाली आहेत,त्यांची तात्कळ बदली करणे,हेरेसरंजाम प्रकरणातील भोगवटदार वर्ग २च्या जमिनी वर्ग १करण्याचे अधिकार चंदगड तहसीलवर याना देण्यात यावेत अशा व अन्य मागण्या १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगून या मागण्या मान्य झाल्या नसल्यास पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे यावेळी सांगितले. 
        अंदोलनस्थळी उदयकुमार देशपांडे, महादेव प्रसादे,तुकाराम बेनके,सुरेश सातवणेकर, मधुकर पाटील, संजय पाटील,विष्णुपंत यादव,कृष्णा पाटील, मनोहर देसाई,कृष्णा वाईंगडे,जनकू पाटील,राजाराम पाटील , कृष्णा कडलगेकर , बाळू रेडेकर , मोहन देसाई , गावडोजी पाटील , प्रल्हाद पाटील , रुक्माना पाटील , जानकू पाटील , अंकुश गावडे , शिवाची चौगुले , रुक्माणा पाटील , तुकाराम भादवणकर , दत्तू पवार,गणेश फाटक,रवि नाईक, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे आदीसह ५५गावातील शेतकऱ्यांनी भेट देऊन अंदोलनाला पाठींबा दिला.


No comments:

Post a Comment