चंदगड येथे रवळनाथ'तर्फे प्रशांत पाटील यांचा एम. एल. चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सौ. पुष्पा नेसरीकर, नारायण काणेकर, डी. के. मायदेव आदी उपस्थित होते. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
श्री रवळनाथ को- ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रशांत पाटील (शिनोळी) यांचा सत्कार संस्थाध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व ग्रंथ देवून सत्कार झाला. येथील चंदगड शाखेत हा कार्यक्रम झाला.
श्री. पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री. चौगुले यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी. के. मायदेव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंदगड शाखाध्यक्ष सौ.पुष्पा नेसरीकर यांनी आभार मानले. यावेळी चंदगड शाखा सल्लागार नारायण काणेकर, चंदगड शाखाधिकारी दिपक शिंदे, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment