चंदगड येथील ३० विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2022

चंदगड येथील ३० विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने सत्कार

 चंदगड येथील ३० विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुस्लिम समाजातील ३० विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी उपस्थितीत होते.

         मुंबईच्या मुद्रा या संस्थेने राज्यातील १०१ प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात श्री. अन्सारी यांचा समावेश आहे. त्याबद्दल आज त्यांचा शाहू स्मारक भवनात सत्कार झाला. या वेळी ते बोलत होते. आमदार जयश्री जाधव, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, मुस्लिम बोडिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, शहराध्यक्ष बापू मुल्ला यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र, गौरवचिन्ह देऊन श्री. अन्सारी यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. तोहीद मुजावर यांनी दहावी - बारावीनंतरच्या अन्सारी करिअरची माहिती दिली. आमदार जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी आणि बारावीच्या २०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर वैद्यकीय व्यवसायातील उल्लेखनीय सेवेबाबत डॉ. वसीम मुल्ला यांचा विशेष सन्मान झाला. माजी महापौर निलोफर आजरेकर, एसबीआय बँकेच्या व्यवस्थापिका लुबना पठाण, हाजी बाबासाहेब शेख, डॉ.नसीमा मुल्ला, जहाँगीर अत्तार, मोहसीन खान, तन्वीर बेपारी, रफिक शेख, सिकंदर मुजावर, बापू मुल्ला, अन्वर मुल्ला, जुबेर काझी, आतिक समडोळे, मुसा खलिफा, बाळासाहेब मोमीन, चंदगड तालुकाध्यक्ष कलिम मदार यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment