आजी-माजी सैनिकांमार्फत लवकरच आर्मी भरतीसाठी कोचिंग क्लासेस..! कुठे वाचा - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2022

आजी-माजी सैनिकांमार्फत लवकरच आर्मी भरतीसाठी कोचिंग क्लासेस..! कुठे वाचा

कालकुंद्री येथे आर्मी, एअर फोर्स, नेव्ही प्रशिक्षण केंद्र फलकाचे अनावरण करताना आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 गावातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर करून विधायक दिशा देण्यासाठी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील आजी-माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेच्या वतीने गावात आर्मी, एअरफोर्स, नेव्ही भरतीसाठी लागणारे प्रशिक्षण लवकरच संघटनेच्या वतीने दिले जाणार आहे. कालकुंद्री- कागणी मार्गानजीक होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.               पूर्णपणे मोफत असलेल्या या प्रशिक्षण केंद्राचा लाभ तरुणांनी घ्यावा. असे आवाहन यावेळी आजी- माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले. फलक अनावरण प्रसंगी शरद जोशी, सुरेश पाटील, बाळकृष्ण पाटील, नरसू पाटील, मारुती कोकीतकर, अनंत कोकीतकर आदी आजी-माजी सैनिक,  पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:

Post a Comment