चंदगड तालुक्यात ज्ञानाची गंगा निर्माण करणारे भगिरथ म्हणजे र. भा. माडखोलकर - टी. टी. बेरडे - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2022

चंदगड तालुक्यात ज्ञानाची गंगा निर्माण करणारे भगिरथ म्हणजे र. भा. माडखोलकर - टी. टी. बेरडे

स्व. र. भा. माडखोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       "स्वातंत्र्याच्या पहाटेनंतर सुध्दा अज्ञानाच्या अंधारात  चाचपडणाऱ्या जनतेला शिक्षणरूपी कवडसा दाखवण्याचे काम खेडूत शिक्षण मंडळाने केले.चंदगड तालुक्यात खेडोपाडी गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा दिवा लावण्याचे काम स्व. र. भा. माडखोलकर सर यांनी केले. आज शिक्षण क्षेत्रात त्यांच्या आचार आणि विचारांची गरज आहे." असे प्रतिपादन टी. टी. बेरडे यांनी केले.

     दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्यु.कॉलेज चंदगड येथे स्व. र. भा. माडखोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

           कार्यक्रमाला एल. डी. कांबळे, प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील, अॅड. आर. पी. बांदिवडेकर, अशोक पाटील, गोपाळ बोकडे, मारुती पाटील, ए. जी. बोकडे, मधुकर मुळीक, प्रकाश चौगुले, प्रा. एस. एम. पाटील, शिवाजी लाड, टी. एस. चांदेकर, प्रा. बी. डी. मोरे , एम. व्ही. कानूरकर, आनंद सुतार व शिक्षक वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment