चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जिल्हा बँकेने हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना अथर्व कंपनीला ताब्यात देताना बँकेचे ६७ कोटी, एचडीएफचे १५ कोटी, कामगार ३० कोटी ६० लाख व शेतकरी २४ कोटी १५ लाख असे एकूण १६२ कोटीचे कर्ज ग्राह्य धरुनच दिला आहे. त्यामुळे थकीत देणी देणं ही अथर्वची जबाबदारीच आहे.शिनोळी (ता. चंदगड) येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजेश पाटील.
तीन हंगामात इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी दर देऊन शेतकऱ्यांचे ११ कोटी ५६ लाख, कामगार पगार कपात करुन ७ कोटी ९२ लाख, असे एकूण १९ कोटी ४८ लाखांची लूट केली आहे. या लुटमार केलेल्या रक्कमेत स्वाभिमानाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी काटामारीतून सांगितलेली रक्कम घातली तर लुटमार केलेल्या रकमेचा आकडा वाढणारा आहे, अडचणीतील दौलत सुरू करुन आपण मोठं काम केलंय, असे अथर्व कंपनीचे अध्यक्ष लोकांना भासवत आसल्याचे प्रतिपादन आम. राजेश पाटील यानी केले. ते शिनोळी (ता. चंदगड) येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
आम. पाटील पुढे म्हणाले, ``दौलत कडून सीमाभागातील शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत न दिल्याने ती मिळावीत. यासाठी बेळगावचे आमदार अनिल बेनके यांनी २०१७ मध्येच केंद्रीय निंबधकांकडे कारखान्यावर अवसायकाची नेमणूक व्हावी अशी मागणी केली होती. पण स्वतःला शेतकरी व कामगारांचे कैवारी समजणाऱ्यांनी कागदपत्रे नीट न वाचताच बिनबुडाचे आरोप करत असल्याचं सांगून आम. पाटील पुढे म्हणाले, ``हलकर्णी येथील फोंड्या माळावर उभ्या राहीलेल्या दौलतसाठी माजी आम. नरसिंगराव पाटील यांच्यासह पाटील कुंटूबीयाचने मोठे योगदान दिले आहे. पण दौलत कारखान्याचे साधे सभासद नसलेले व ज्यांचा एक टन ऊसही कारखान्याला नाही, अशा सेंटलमेंट बहाद्दूरांकडून मी कारखाना बंद करण्यासाठी प्रयत्न करतोय असा आरोप का सहन करायचा का? दौलत कारखाना सभासदांचा कसा राहील, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.``
``चंदगड तालुका संघाने दौलत चालविणेसाठी निविदा दाखल केली होती. पण केडीसीसी बँकेला अथर्व इंटरट्रेड कंपनीने अडचणीत असलेली दौलत चालविण्यास आपण सक्षम आहे. असे भासविल्यामुळेच अथर्वला तो कारखाना ३९ वर्षांच्या कराराने चालवायला दिला. पण अथर्व कंपनीचे अध्यक्ष शेतकरी, कामगार, सेवानिवृत्त कामगार यांची देणी देताना आता आढेवेढे का घेत आहेत. असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जिल्हा बॅकेने २०१९ ला दौलत साखर कारखाना अथर्व कंपनीला चालवायला दिला. त्यावेळी कामगारांनी ज्यांना डोक्यावर घेऊन फटाके फोडले, त्यांची आता लायकी समजल्यामुळे कामगारांंनीच त्यांना जबरदस्त दणका दिलाय. त्यामुळे दौलतविषयी दाखवत असलेले त्यांचे प्रेम हे बेगडी आहे, हे चंंदगडची जनता ओळखण्याइतकी दुधखुळी नाही हे त्यानी लक्षात ठेवावे.``
यावेळी तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी, जानबा चौगुले, परशराम पाटील, अली मुल्ला, नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भिकू गावडे, यावेळी दौलतचे माजी सचिव एस. एल. पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment