प्रथम क्रमांकाचे बक्षीस वितरण करताना श्रीकांत पाटील, वैजनाथ पाटील, विठोबा मुंगूरकर आदी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील अचानक तरुण मंडळ यादव गल्ली आयोजित रस्सीखेच स्पर्धांचा थरार क्रीडा रसिकांनी अनुभवला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भीम क्रांती मंडळाने सुभाष गल्ली वर मात केली. तिसरा व चौथा क्रमांक अचानक तरुण मंडळाने तर पाचवा क्रमांक तानाजी गल्लीने पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन सेवा सोसायटी चेअरमन अशोक पाटील व चंदगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले तर बक्षीस वितरण माजी सैनिक वैजनाथ पाटील, प्राथमिक शिक्षक विठोबा मुंगूरकर, अर्जुन पाटील, वैभव जाधव यांच्या हस्ते पार पडले.
प्रास्ताविक विजय कोकितकर यांनी केले. स्पर्धा पंच म्हणून प्रमोद पाटील, दुधाप्पा पाटील, भावकू पाटील, पुंडलिक जोशी, नारायण पाटील यांनी काम पाहिले. या थरारक स्पर्धेचे धावते समालोचन विलको कोकीतकर व सागर पाटील यांनी केले. आभार सचिन कोकितकर यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अचानक तरुण मंडळ यादव गल्ली- अ च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment