चंदगड येथील माडखोलकरमध्ये राष्ट्रीय एकता दिन संपन्न, सद्भावना दौडमधून दिला एकतेचा संदेश - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2022

चंदगड येथील माडखोलकरमध्ये राष्ट्रीय एकता दिन संपन्न, सद्भावना दौडमधून दिला एकतेचा संदेश

 माडखोलकरमध्ये राष्ट्रीय एकता दिन व सद्भावना दौडमध्ये सहभागी विद्यार्थ्यी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली व त्यानंतर राष्ट्रीय एकता दौड मध्ये सहभागी होऊन एकतेचा संदेश सर्वांना दिला. 

       भारतात ५६५ संस्थानांचे विलीनीकरण करून राष्ट्रीय ऐक्य व देशाची अखंडता अबाधित राखण्याचे कार्य स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले त्यांच्या या कार्याची ओळख म्हणून संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात येते. 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही संकल्पना साकारण्यासाठी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले. "रन फॉर युनिटी" या उपक्रमांतर्गत सद्भावना दौडचे आयोजन करून धर्म,भाषाभेद, विषमता आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त राहून निरपेक्ष, मानवतावादी, उच्चविचारी, मूल्याधिष्ठित भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध रहानेसाठीचा संदेश देण्यासाठी या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते.

          या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रकल्प अधिकारी प्रा. एस. एन. पाटील व NSS विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रा. एस. के. सावंत,  प्रा व्ही. के. गावडे, प्रा. शाहू गावडे, डॉ. एन. एस. मासाळ, प्रा एस. एस. सावंत, प्रा. जी. वाय. कांबळे यासह सर्व स्टाफ उपस्थित होता. प्रास्ताविक प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. डॉ. एन. के. पाटील यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या उपक्रमात सर्व स्टाफ, स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment