चंदगड येथे १० नोव्हेंबर रोजी भजन स्पर्धा, ७५ हजारांची बक्षिसे, स्पर्धकांनी संपर्क साधण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2022

चंदगड येथे १० नोव्हेंबर रोजी भजन स्पर्धा, ७५ हजारांची बक्षिसे, स्पर्धकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

         चंदगड येथील माऊली रवळनाथ भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने गुरुवार दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य वारकरी सांप्रदायिक खुल्या भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

       श्री रवळनाथ मंदिर चंदगड येथे संपन्न होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना रोख बक्षिसे अनुक्रमे रुपये- १११११, १०१११, ९१११, ८१११, ७१११, ६१११, ५१११, ४१११, ३१११, २५०१ व भव्य ट्रॉफी तसेच वैयक्तिक उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट पखवाज वादक यांना प्रत्येकी रोख रुपये १,१११/- व ट्रॉफी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियम- वेळ १८ मिनिटे, या वेळेत दोन अभंग एक गवळण सादर करावी, तीन स्पर्धकांनी गायन करावे इतरांनी कोरस गायन करावे, सर्व कलाकार एकाच गावातील पाहिजे यासाठी आधार कार्ड आवश्यक, एका संघात ७ ते ११  स्पर्धक असतील.

         स्पर्धेची प्रवेश फी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भरून घेतली जाईल. यासाठी  वैभव मुळीक ९४२१२८४९४०, महादेव गावडे ९६२३०५८३१६ संदीप निटूरकर ९१७५७६९३९१, यशवंत डेळेकर  ९४२३८०५४३४ या क्रमांकांवर ९ नोव्हेंबर पूर्वी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment