चंदगड येथे सोमवारी भव्य कबड्डी स्पर्धा, 7 हजार, 5 हजार, 3 हजार अशी अनुक्रमे बक्षिसे - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2022

चंदगड येथे सोमवारी भव्य कबड्डी स्पर्धा, 7 हजार, 5 हजार, 3 हजार अशी अनुक्रमे बक्षिसे

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

चंदगड येथे एजी क्लब चंदगड यांच्या वतीने दि. 7 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भव्य 60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात  आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 7001 रुपये बक्षीस  चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर व हॉटेल प्रणाम चे लक्ष्मण गावडे यांनी देऊ केले आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी  5001 रुपयांचे बक्षीस नगरसेवक बाळासाहेब हळदणकर व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांबळे यांचेकडून तर तिसऱ्या क्रमांकाचे 3001 रुपयांचे बक्षीस प्रदीप लक्ष्मण  कडते यांनी देऊ केले आहे. 

    या कबड्डी स्पर्धेसाठी नगरसेवक अभिजीत गुरबे यांनी किट स्पॉन्सर केले आहे तर  सिद्धेश कोरगावकर यांचेकडून ढाल व उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट संघ यासाठी चषक ही देण्यात येणार आहेत.  अभिजीत  कार्वेकर यांच्याकडून उत्कृष्ट रायडरसाठी चषक देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, विनायकनगर, चंदगड येथे होणार असून या स्पर्धेसाठी रोहित जुवेकर, अभिजीत कार्वेकर, सुनील देसाई, सुनील मासरणकर, सुरेश उर्फ गुंडू देसाई, बबलू गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. इच्छुकांनी राजू हळदणकर (9527871319) व अनिकेत पाटील (7249658031) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment