अज्ञाताने केलेल्या मारहाणीत तुपूरवाडी येथे बालकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2022

अज्ञाताने केलेल्या मारहाणीत तुपूरवाडी येथे बालकाचा मृत्यू

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

तुपूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथे कर्नाटकातून  येऊन तात्पुरते राहिलेल्या  कु. शंकर कंचप्पा हारके वय वर्ष ४ ते ५ मूळ गाव (रा. केंपटी, ता. रायबाग, जि. बेळगाव) या बालकाच्या गुप्तांगावर जबर मारहाण करून अज्ञाता ने खून केल्या ची घटना आज दि. ४ रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली.

या संदर्भातील नेसरी पोलिसात वर्दी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंगूरवाडी ता . गडहिंग्लजचे वैद्यकिय अधिकारी डॉ . मिलिद मिरजकर यानी दिली असून या घटनेची नोंद नेसरी पोलिसात झाली आहे.

अधिक माहिती अशी, कर्नाटकातून तुपूरवाडी येथे आलेल्या कु. शंकर ला अज्ञाता कडून गुप्तांगावर जबर मारहाण कुरण्यात आली यामध्ये अंडकोशालाही मार लागल्याने त्याचे उजव्या बाजूचे अंडकोष बाहेर आले. तसेच त्याच्या मानेभोवती  कशाने तरी आवळल्याचा व्रण उठला आहे. हि घटना समजताच त्याच्या नातेवाईकानी तात्काळ प्रा. आ. केंद्र मुंगूरवाडी येथे उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचा अहवाल डॉक्टरनी दिला. यानुसार  नेसरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपासासाठी गडहिंग्लज पोलिस ठाणे कडे वर्ग करण्यात आला आहे.

बालकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने मुंगूरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment