कोल्हापूर येथे तोडगा न निघाल्याने मंगळवारी पुन्हा बैठक, दौलत कामगार संघटनेच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2022

कोल्हापूर येथे तोडगा न निघाल्याने मंगळवारी पुन्हा बैठक, दौलत कामगार संघटनेच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने बोलावण्यात आलेल्या बैठकीत दौलत-अथर्व साखर कारखाना चालु करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे मंगळवारी दि. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता कारखाना कार्यस्थळावर मेळावा घेण्यात येणार आहे. 

          या बैठकीला दौलत बचाव संघर्ष समीती, दौलतचे चेअरमन, संचालक मंडळ, आमदार राजेश पाटील, जेष्ट संचालक गोपाळराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, तालुक्यातील सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व शेतकरी, सभासद, तोडणी, वहातुकदार,  दौलत संदर्भातील सर्व घटक, हितचिंतक, सर्व आजी-माजी कामगार बंधु या सर्वांनी  कारखाना कार्यस्थळावर उपस्थीत रहावे, असे आवाहन दौलत कामगार संघटनेच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment