दोन पिढ्यांतील शेतजमिनीचा वाद ४७ वर्षानंतर अखेर लोकन्यायालयात तडजोडीने मिटला - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2022

दोन पिढ्यांतील शेतजमिनीचा वाद ४७ वर्षानंतर अखेर लोकन्यायालयात तडजोडीने मिटला


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील न्यायालयामध्ये आज राष्ट्रीय लोकन्यायालय अंतर्गत प्रलंबित व दाखलपुर्व दावे सामजषांने मिटविण्यासाठी लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. यामध्ये विविध प्रकारची प्रकरणे तडजडीनो मिटवण्यात आली. 

       या लोकन्यायालयामध्ये दाखल पूर्व ९६४ प्रकरण ठेवण्यात आली होती, त्यापैकी ४२ प्रकरणे निकाली निघाली. तर न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये २५० प्रकरणापैकी पंधरा प्रकरणे निकाली. यातून एकूण १३ लाख ४५ हजार १४७ रुपयांची वसुली झाली.

      या लोकन्यायालयामध्ये दिवाणी प्रकरणे दिवाणी प्रकरणे, तडजोडीने अपराधिक प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचाराची तसेच पोटगीची प्रकरणे, रक्कम वसुलीचे दावे, दरखास्ती अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोकन्यायालयासाठी पॅनल प्रमुख म्हणून चंदगडच्या न्यायाधीश अमृत बिराजदार व पॅनल सदस्य म्हणून ॲड. के. जे. नाकाडी यांनी काम पाहिले. सहाय्यक अधीक्षक के. एन. धुमाळ व विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक अरविंद लोंढे यांचे या कामी सहकार्य लाभले. यावेळी चंदगड तालुका बार असोशिएशनचे सचिव ॲड. व्ही. डी. पाटील, खजिनदार, ॲड. संदिप पाटील, ॲड. व्ही. एन. पाटील, ॲड. एस. एस. पाटील, ॲड. एस. एस. कोट, ॲड. एम. डी. सुतार, ॲड. के. जे. नाकाडी, ॲड. सी. एस. पाटील, ॲड. भारती कांबळे यांच्यासह वकील उपस्थित होते. 

आजच्या लोकन्यायालयाचा वैशिष्टपुर्ण निकाल

         चंदगड येथे आयोजित आजच्या लोकन्यायालयाचे वैशिष्ट्य ठरला तो शिरगाव येथील दावा. गेले दोन पिढ्या चालू असलेला ४७ वर्षांपूर्वीचा शेतजमिनीचा दावा दोन्ही पक्षकारांना निम्मी-निम्मी शेतजमिन देवून मौजे शिरगाव (ता. चंदगड) येथील तंटामुक्त कमिटी व अन्य लोकांच्या सहकार्याने यांच्या अथक परिश्रमाने हा दावा मिटवण्यात आला. 

No comments:

Post a Comment