राधानगरी विधानसभा मतदारसंघात मनसेने शड्डू ठोकला, ११० ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकतीने लढवणार - जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2022

राधानगरी विधानसभा मतदारसंघात मनसेने शड्डू ठोकला, ११० ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकतीने लढवणार - जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले

राधानगरी येथील बैठकीत बोलताना जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले

राधानगरी /  सी. एल. वृत्तसेवा

राज ठाकरेंच्या आदेशाने मनसे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ११० ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकतीने लढवणार आहे. या संदर्भातील बैठक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी मुदाळतिट्टा येथे पार पडली.

 राज ठाकरे यांनी मनसेला संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरात कामाला लागली आहे. राज्यात ७७५१ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.  कोल्हापूरत जिल्ह्यातील  राधानगरी विधानसभा मतदारसंघात जवळपास ११० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या सर्वच निवडणुका लढवणार असल्याची माहिती मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिलीय.


    राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त मनसेकडे असणारे सुशिक्षित तरुण या मनसेच्या पॅनेलकडून निवडून येतील आणि गावाचा विकास करतील, असं मनसेचे गटनेते युवराज येडूरे यांनी सांगितले. 

     ग्रामपंचायत स्तरावरती आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभा करून गावातील सर्व स्तरातील व्यक्तींचे विकास काम होण्यासाठी ताकदीने काम करणारा असे मत राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

     ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न घेऊन काम करा नक्कीच जनता आपल्याला निवडून देईल यापुढे देखील या ११० ग्रामपंचायती ताकतीने लढवण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी करावे यासाठी लागेल तेथे आम्ही ताकतीने काम करणार असे मत भुदरगड तालुकाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी राधानगरी शहराध्यक्ष राजेश चव्हाण, प्रवीण मनुगडे, राहुल कुंभार, अमित कोरे, सौरभ कांबळे, रणजीत पाटील, ऋषभ आमते,उत्तम चव्हाण, रोहित कांकेकर, मारुति सतपुते, जगदीश पाटिल, तुकाराम कांबळे, पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.No comments:

Post a Comment