शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कोवाड कॉलेजच्या खेळाडूंचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2022

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कोवाड कॉलेजच्या खेळाडूंचे यशचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

नोव्हेंबर २०२२ ला आर. आर. कॉलेज जत सांगली येथे पार पडलेल्या अंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) च्या तीन खेळाडूनी भरीव यश संपादन केले. 

यामध्ये अनुक्रमे कु. प्राजक्ता परशराम शिंदे,५०००मी.,धावणे प्रथम क्र. व १००००मी. धावणे द्वितीय क्र., सुशांत मनोहर जेधे ५०००मी. प्रथम क्र., किरण संजय मगदूम तृतीय क्र. मिळविला.              महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. पवार, सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, संस्था सचिव एम. व्ही. पाटिल, प्रा. एन. एस. पाटिल यांनी यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक प्रा. आर. टि. पाटिल यांचे अभनंदन केले.

No comments:

Post a Comment