अवैध दारू, गुटखा विक्री व मटका वर कारवाई करा...! कोणी केली पोलिसांकडे मागणी? - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2022

अवैध दारू, गुटखा विक्री व मटका वर कारवाई करा...! कोणी केली पोलिसांकडे मागणी?

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुका हा कर्नाटक, गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने येथून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक व विक्री होते. याच्या जोडीला मटका देखील सर्रास सुरू आहेच. यातून वाम मार्गाला लागलेल्या चंदगड तालुक्यातील युवा पिढीचे भवितव्य अधांतरी बनले आहे. दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अवैधरित्या सुरू असणारा मटका, गुटखा व दारू विक्री दिवसागणिक वाढत चालली आहे. 

    पोलिस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांना थारा न देता त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संदीप नांदवडेकर, मनसे तालुका अध्यक्ष राज सुभेदार, ओ.बी.सी मोर्चा अध्यक्ष प्रसाद वाडकर, विद्यार्थी सेना उप तालुकाप्रमुख शुभम गावडे, अमृत गावडे, पांडूरंग पाटील, गजानन पाटील, जानकोबा पाटील, शंकर सुंडकर आदी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment