कोनेवाडी ते हेरे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साईट पट्ट्यांची काम करावी - मनसेच्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2022

कोनेवाडी ते हेरे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साईट पट्ट्यांची काम करावी - मनसेच्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन

निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील कोनेवाडी ते हेरे रोडवरून गोव्याला जाणाऱ्या गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. या रस्त्यावर झाडे-झुडपे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गुगल मॅप वर हा रोड दिसत असल्यामुळे गाड्यांची या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोनेवाडी ते हेरे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून साईट पट्ट्यांची काम करावे. या मागणीसाठी चंदगड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बांधकाम विभागाला निवेदनातून केली आहे. 

       या रोडवरील सर्व झाडे व्यवसाय पट्ट्यांचे काम लवकरात लवकर करावे, अपघात झाल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात येईल. याची नोंद घेऊन काम पूर्ण करावे नाहीतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरणार आहे. निवेदनावर परशराम मळवीकर, अमर कांबळे, अविनाश पाटील, शुभम कालेलकर, विवेक मनगुतकर, राजू देसाई. नितेश जाधव, संदीप गावडे, संजय मुळीक, हनुमंत पाटील आदीच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment