चंदगड शहरामध्ये जलतरण तलाव (स्वीमिंग पुल) व्हावे - नागरीकांची नगराध्यक्षांच्याकडे निवेदनातू मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2022

चंदगड शहरामध्ये जलतरण तलाव (स्वीमिंग पुल) व्हावे - नागरीकांची नगराध्यक्षांच्याकडे निवेदनातू मागणी

निवेदन देताना चंदगडमधील नागरीक.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड शहरामध्ये पोहण्यासाठी जलतरण तलाव (स्वीमिंग पुल) उपलब्ध नाही. त्यामुळे शहरामधील नागरिकांना तसेच लहान मुलान पोहण्यासाठी नदी किंवा तलाव त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पोहण्याच्या ठिकाणी काही घटनामध्ये जीवितहानी झाल्यामुळे सदर जागादेखील असुरक्षित बनल्या आहेत. त्यामुळे चंदगड नगरपंचायत हद्दीमध्ये एक जलतरण तलाव (स्वीमिंग पुल) व्हावा. या मागणीचे निवेदन नागरीकांना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.  

          पोहायला शिकणाऱ्यांना त्याचा लाभ होईल व यातून उदयोन्मुख पोहणारे खेळाडू आपल्या चंदगड नगरीमधून तयार व्हायला मदत होईल. असा दुहेरी हेतु साद्य होईल. यासाठी जलतरण तलावा व्हावी अशी नागरीकांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन आमदार राजेश पाटील,  तहसिलदार व मुख्याधिकारी यांनाही दिले आहे. भगवान पाटील, भरमू घोळसे, डॉ. प्रा. पी. आर. पाटील, डॉ. सुनिल हासुरे यांनी हे निवेदन दिले आहे. 

No comments:

Post a Comment