चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2022

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस बाल दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याद्यापक एन. डी. देवळे होते.

        पं. नेहरूच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधापक एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले. "मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. मुलं काय शिकतात त्यापेक्षा त्यांच्यावर योग्य वेळी संस्कार करण्यासाठी शिक्षक व पालक यांनी पाहणे गरजेचे आहे. "असे प्रतिपादन प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर यांनी केले. यावेळी आर्या निळकंठ, संगीता यमकर, वेदांत निळकंठ, श्रेया कोपर्डे, श्रेयश्री तेजम, संस्कार गुरव, श्रावणी गुरव, अनन्या गुरव या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

       कार्यक्रामाला सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. व्ही. कानूरकर, एस. जी. साबळे, टी. व्ही. खंदाळे, व्ही. टी. पाटील, टी. टी. बेरडे, एस. जे. शिंदे, जे. जी पाटील, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, एस. जे. शिंदे, सूरज तुपारे, शरद हदगल, रवि कांबळे, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, विद्या शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋतूजा शिंदे व शर्वरी पाटील यांनी तर आभार आफिया नाईकवाडी हिने मानले.

No comments:

Post a Comment