आजरा कारखान्याची १५ नोव्हेंबर अखेरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2022

आजरा कारखान्याची १५ नोव्हेंबर अखेरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

प्रा. सुनिल शिंत्रे


आजरा / सी. एल. वृत्तसेवा 

     गवसे (ता. आजरा) येथील आजरा सहकारी साखर कारखान्याने ३०/१०/२०२२ ते १५/१२/२०२२ अखेर गाळप केलेल्या ऊसाची बीले ३००० रु प्रमाणे विनाकपात ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यानी दिली. 

          आजरा साखर कारखान्याचे २५ दिवसात ७५७० मे . टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवून ९ .७० % उताऱ्याने ७१४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. २०२२/२३ या हंगामात कामगार व शेतकऱ्यांच्या सहकार्यावर कारखाना व्यवस्थित रित्या सूरू आहे.या हंगामात कारखान्याने ४.५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.गाळप झालेल्या ऊसाचे पैसे दर पंधरा दिवसांनी विना कपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असून कारखाना क्षेत्रातील व कारखाना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस आजरा कारखान्याला पाठवावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment