हलकर्णी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2022

हलकर्णी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा

यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       दौलत विश्वस्त संस्थेचे यशवतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज यशवतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉ. बी.. डी. अजळकर यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल गवळी यांनी  यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यीक व राजकीय कार्याचा आढावा घेतला. माजी प्र. प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील उपस्थित होते. 

          यावेळी प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. प्रशांत शेंडे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. एस. पी. घोरपडे, प्रा. कोलकार, प्रा. ज्ञानेश्वर पाटील, प्रा. डी. जे. भोईटे, सुधीर गिरी, एस. जी. कांबळे व विदयार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ. जे. जे. व्हटकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment