तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये बसर्गेचे भावेश्वरी विद्यालय प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2022

तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये बसर्गेचे भावेश्वरी विद्यालय प्रथम

 


 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील शासकीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत शारदा शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर संचलित भावेश्वरी विद्यालय बसर्गे शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे .या त्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक होत आहे.

सदर स्पर्धेमध्ये 

समृद्धी नारायण ओऊळकर

सुचिता वैजनाथ ओऊळकर

सलोनी सुबराव ओऊळकर

श्रेया शिवाजी ओऊळकर

सानिका सतिश मुरकुटे

स्नेहल मारुती भोवड

साक्षी शिवाजी ओऊळकर

स्वराली दिलीप ओऊळकर

भक्ती शिवाजी पाटील

हर्षदा वसंत भोगुलकर

ज्योती नारायण पेडणेकर

रोहिणी निवृत्ती गावडे या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ही स्पर्धा जिंकली आहे संस्थेचे सचिव जे.  बी. पाटील मुख्याध्यापक जे. जे. कोकीतकर, क्रीडा शिक्षक एस. जे. पाटील, अनिल कुट्रे, पी. जी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.No comments:

Post a Comment