केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उमगाव शाळेचे यशस्वी विद्यार्थ्यी.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जांबरे (ता. चंदगड) येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उमगाव शाळेने आज जनरल चॅम्पियनशिप मिळवली. कब्बड्डी मुले, मुले लहान गट, मोठा गट वैयक्तिक 50 मीटर, 100 मीटर, धावणे, 200 मीटर, रिले, लांबउडी, उंचउडी, मुले, मुली एकूण मिळून 11 नंबर पटकावले. हे सर्व सुयश आपल्या सर्वांच्या प्रेम आणि आशिर्वादामुळे शक्य झालं. तसेच याबाबत गावात मिरवणूक काढून सर्वांनी भरभरून कौतुक केले.
सर्व विद्यार्थी, शिक्षक भारवून गेले. काहींनी तर स्व-खर्चाने फटाके वाजवले. त्या सर्वांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व शाळा कमिटी सदस्य यांचेकडून सर्व पालक, मार्गदर्शक सोमनाथ पेडणेकर तसेच सर्व तरुण वर्ग, कार्यकर्ते सर्व यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विनोद कोरवी, शिक्षक राजाराम नाईक, कविता कांबळे, श्वेता गावडे, मार्गदर्शक सोमनाथ गावडे यांंचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment