संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर टळले, कसा केला विरोध......... - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2022

संभाजी ब्रिगेडच्या विरोधामुळे मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर टळले, कसा केला विरोध.........

कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

        शंभर पेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या जुना राजवाडा, भवानी मंडप कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा घाट घातला जात होता. याची कुणकुण लागताच या प्रकाराला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवला. ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश सुभाष पाटील यांनी याप्रश्नी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यापूर्वीही रुपेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी छ. संभाजी महाराजांचा अपमान ठरणाऱ्या 'संभाजी बिडी' चे नाव बदलण्यास भाग पाडले होते. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे लिखाण असलेली पुस्तके प्रकाशक व वितरकास जाब विचारून पुस्तके जप्त केली. शिवाजी विद्यापीठाकडून संबंधितांना आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यास भाग पाडले होते. कागल पंचतारांकित एमआयडीसी मधील कामगारांना न्याय मिळवून देणारी आंदोलने, कोरोना काळात पाचगाव परिसरात सुरू केलेले १०० खाटांचे कोविड सेंटर शेकडो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे ठरले होते. अशा शेकडो लोकाभिमुख कार्यामुळे जिल्हा संभाजी ब्रिगेड नेहमी चर्चेत राहिले आहे.

    मेन राजाराम हायस्कूल स्थलांतराबाबतही रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवण्यात आला होता. त्यांना या कामी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, सहसंघटक मनोज गायकवाड, संपर्कप्रमुख दिनेश जगदाळे आदींचे मार्गदर्शन लाभले. आंदोलनाला यश येऊन शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री यांनी सदरचे स्थलांतर करणार नसल्याचे लेखी पत्र शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांना पाठवले आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी पत्राद्वारे संभाजी ब्रिगेडला कळवली आहे. 

        या स्थलांतराला माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजीराव नलावडे, कोल्हापूर जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष उदय पवार यांनीही निवेदनाद्वारे विरोध केला होता. संभाजी ब्रिगेडने मेन राजाराम हायस्कूल स्थलांतर प्रश्नी घेतलेल्या भूमिकेस यश आल्यामुळे समस्त कोल्हापूरकर तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment