सुदृढ आरोग्य हा जीवनाचा पाया - डॉ. स्नेहल मुसळे - पाटील, माडखोलकर महाविद्यालयात "किशोरवयीन मुलींचे आरोग्य : समस्या व उपाय" या विषयावर कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2022

सुदृढ आरोग्य हा जीवनाचा पाया - डॉ. स्नेहल मुसळे - पाटील, माडखोलकर महाविद्यालयात "किशोरवयीन मुलींचे आरोग्य : समस्या व उपाय" या विषयावर कार्यशाळा

 

व्यासपीठावर डॉ. स्नेहल मुसळे, प्राचार्य. डॉ. पी.आर.पाटील, डॉ. एस.एस.सावंत, डॉ. पी.एल. भादवणकर, डॉ. आर. ए. कमलाकर

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
      अलिकडे धकाधकीच्या जीवनामुळे किशोरवयीन मुलींचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. जीवनशैलीत योग्य ते बदल करून मुलींनी आहार, विहार, निद्रा यांच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य चांगले राहिले तरच जीवन यशस्वी होऊ शकते. हे लक्षात घेऊन मुलींनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुदृढ आरोग्य हाच जीवनाचा भक्कम पाया आहे. असे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल मुसळे पाटील यांनी केले. त्या येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत "किशोरवयीन मुलींची आरोग्य : समस्या व उपाय" या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होत्या. डॉ. मुसळे यांनी प्रथम सत्रात मार्गदर्शन केले आणि दुसऱ्या सत्रात विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले.

 
       कार्यशाळेस गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व अग्रणी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य पी. आर. पाटील म्हणाले, 'मुलींच्या मध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झाली पाहिजे. तसेच तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवे. या गोष्टीकडे तरुण मुलींनी अजिबात दुर्लक्ष करू नये. उत्तम आरोग्य हा यशस्वी जीवनाचा मूलाधार आहे हे लक्षात घ्यावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षाला जलार्पण करून कार्यशाळेला सर्वात झाली. 
        अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी आभार मानले.                 
           कार्यशाळेला डॉ. वृषाली हेरेकर, प्रा. मंगलुरकर, डॉ. एम. एम. माने, डॉ. टी. ए. कांबळे,  प्रा. डॉ. भूपाल दिवेकर, डॉ. गंगासागर चोले, प्रा. उपलकर, प्रा. प्रियांका कांबळे, प्रा. पूजा पाटील, प्रा. लक्ष्मी कर्जगे, प्रा. काळजी, प्रा. अश्विनी पाटील तसेच विविध महविद्यालातून समन्वयक, प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment