चंदगड येथील 'माडखोलकर' महाविद्यालयामध्ये ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2022

चंदगड येथील 'माडखोलकर' महाविद्यालयामध्ये ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या मार्फत  राबविण्यात येणारा ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रम येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात नुकताच सुरू करण्यात आल्याची माहीती प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील यांनी दिली.

        या अभ्यासक्रमामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. अभ्यासक्रमाबरोबरच पत्रकारितेतील  नवनवीन  संकल्पना व कार्याचा वस्तुपाठ यांचीही जोड दिली जाणार असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची कौशल्य वृद्धी घडणारआहे.  सदर संधीचा लाभ घेऊन इच्छुकांनी प्रा. डॉ. जी. वाय. कांबळे यांचेशी संपर्क करावा. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे - समन्वयक प्रा. डॉ. जी. वाय.कांबळे यांच्याशी 7083728620 क्रमांकावर संपर्क साधावा. इच्छुकांनी त्वरित संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment