यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रानभाज्या प्रदर्शन महोत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2022

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रानभाज्या प्रदर्शन महोत्सव

रानभाज्या प्रदर्शन महोत्सव

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयमध्ये रानभाज्या प्रदर्शन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चंदगड तालुक्यामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन माडण्यात आले होते.

       दुर्मिळ अशा रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म माहिती करून देणे व या  रानभाज्यांविषयी  आवड निर्माण करणे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. चंदगड तालुक्यातील परिसरात आढळणाऱ्या भुई आवळा, आळू, सुरन, घोळ, ओवा करडू, अबांडी, भरांगी, टाकळा अशा अनेक भाज्या प्रदर्शनात मांडल्या होत्या. आजूबाजूला आढळणाऱ्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी  प्रदर्शनात मांडले होते.

          या प्रदर्शनाचा हेतू प्रास्ताविकतेतून  वनस्पती विभाग प्रमुख डॉ. ए. व्ही.पाटील यांनी स्पस्ट केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना एन. एम मोरे म्हणाले, रान भाज्या या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात व त्यामुळे त्या विषमुक्त असतात. तसेच रानभाजी व सेंद्रिय भाजी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बी.डी.अजळकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडील, तसेच शेजारी व गावातील शेतकरी यांना रानभाज्यांच्या विषयीचे प्रबोधन करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ.ए.पी गवळी ,डॉ.आय आर जरळी, डॉ.राजेश घोरपडे व इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एन. पी. पाटील यांनी तर आभार प्रा. सावरे  यांनी केली.

No comments:

Post a Comment