दौलत' कारखाना सुरू करण्यासंदर्भात दौलत बचाव शिष्टमंडळ गुरुवारी जिल्हा बँकेत जाणार - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2022

दौलत' कारखाना सुरू करण्यासंदर्भात दौलत बचाव शिष्टमंडळ गुरुवारी जिल्हा बँकेत जाणार


चंदगड /प्रतिनिधी
 हलकर्णी येथील 'दौलत'  साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार यांची सभा झाली.  दौलत कारखाना तात्काळ सुरू करावा अशीच उपस्थित सर्वांनी भूमिका घेतली. 
जाहिरात

मात्र अथर्व कंपनी आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने पुढील निर्णयासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांची भेट घेण्यासाठी तालुक्यातील, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना संचालक, तोडणी वाहतूकदार व कामगार यांचा समावेश असलेले दौलत बचाव शिष्टमंडळ कोल्हापूर येथील जिल्हा बँकेत जाणार आहे. ऐन हंगामाच्या सुरवातीलाच कामगार व अथर्व इंटरट्रेड चा वाद निर्माण झाल्याने हंगाम सुरू होतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.No comments:

Post a Comment