कोवाड येथील विमल सोनार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2022

कोवाड येथील विमल सोनार यांचे निधन

 

विमल सोनार

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

कोवाड (ता. चंदगड) येथील विमल रुद्राप्पा सोनार (वय 85) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोवाड येथील मर्चंट पतसंस्थेच्या संचालिका वर्षा विजय सोनार यांच्या त्या सासू होत. कोवाड येथील किणी कार्यात पतसंस्थेचे माजी संचालक विजय सोनार, कोवाड येथील सराफ व्यावसायिक सुरेश सोनार तर बेळगाव, पांगुळ गल्ली येथील सराफ व्यावसायिक अनिल सोनार यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी दहा वाजता होणार आहेत. No comments:

Post a Comment