मिटर टेस्टींगची सोय चंदगडला व्हावी, या मागणीसाठी नागरिकांनी सुरू केले आमरण उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2022

मिटर टेस्टींगची सोय चंदगडला व्हावी, या मागणीसाठी नागरिकांनी सुरू केले आमरण उपोषण

मिटर टेस्टींगची सोय चंदगडला व्हावी, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आंदोलक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           चंदगड तालुका हा दुर्गम भाग असल्यामुळे येथून जनतेला मिटर टेस्टींगसाठी गडहिंग्लज येथे जावे लागत आहे. पुर्वी मिटर टेस्टींग ही चंदगड येथेच करणेत येत होती. परंतु महावितरणच्या मनमानी कारभारामुळे येथील मिटर टेस्टींग गडहिंग्लज येथे करण्यात येत आहे. हे मिटर टेस्टींग चंदगडला व्हावे या मागणी साठी गेली दोन वर्ष निवेदन दिले होते. त्याची अद्याप महावितरण कडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोल्हापूर डिव्हीजन ऑफीस, गडहिंग्लज उप विभाग ऑफीस या ठिकाणी वारंवार दुरध्वनीव्दारे चौकशी केली असता अद्याप कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे आज नागरिकांना आमरण उपोषण ला बसावे लागले.

                                                                           जाहिरात

जाहिरात

     ग्रामीण भागातून मिटर टेस्टींगसाठी पारगड, कोलीक, कोवाड, राजगोळी, कोदाळी , कामेवाडी अशा १०० कि. मी. अंतरावरुन प्रवास करुन अतिदुर्गम भागातील जनतेला तेथे वेळेत जाणे शक्य होत नसल्याने त्यांना आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. तरी विषयी त्वरीत कार्यवाही व्हावी मिटर टेस्टींग चंदगड येथेच करण्यात यावे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील थोडासा दिलासा मिळेल, त्यांची होणारी धावपळ थांबेल तरी वरील सर्व समस्यांची विचार विनिमय राज्य सरकारने तात्काळ करावा. नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन ओबीसीं संघटनेचे अध्यक्ष कलिम मदार, सिताराम नाईक, नागेश प्रधान आदी नागरिक आमरण उपोषण करत आहेत. 

No comments:

Post a Comment