नागनवाडी येथील डॉ. गोपाळ गावडे लिखित चंदगडी बोली भाषेतील उंबळट पुस्तकाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2022

नागनवाडी येथील डॉ. गोपाळ गावडे लिखित चंदगडी बोली भाषेतील उंबळट पुस्तकाचे प्रकाशन

                                           डॉ. गोपाळ गावडे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयातील मराठी विभागाचे  प्रा. डॉ. गोपाळ गावडे लिखित चंदगडी बोलीतील 'उंबळट' या व्यक्तीचित्रण संग्रहाचे शुक्रवार ११ रोजी दुपारी ३.४५ वाजता महावीर महाविद्यालयात प्रकाशन होणार आहे. बी. ए. बी. एड. माजी विद्यार्थी संघ आणि चंदगड तालुका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

                                                 जाहिरात

जाहिरात

         प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे प्रमुख वक्ते आहेत. प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे अध्यक्षस्थानी असून महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते विष्णू जोशिलकर, उद्योगपती जे.  बी. बाचुळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. 

           चंदगडी बोली भाषेतील लेखन सामुग्री वाचकांना वाचण्याला मिळणार आहे. या बरोबरच चंदगडच्या लेखन सामुग्री मध्ये या पुस्तकाने भर पडणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बी. ए. बी. एड. माजी विद्यार्थी संघ आणि चंदगड तालूका मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment