![]() |
चंदगड अर्बन टेनिस बॉल क्रिकेट चषक २०२२ मधील विजेतेपदाची ट्राॅफी चेअरमन दयानंद काणेकर यांच्या हस्ते स्विकारताना आर. बी. स्पोट्र्स नागनवाडीचा संघ. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरामध्ये लोकप्रिय असलेल्या चंदगड अर्बन टेनिस बॉल क्रिकेट चषक २०२२ मध्ये मर्यादित ३२ संघानी सहभाग घेतला होता. या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर. बी. स्पोट्र्स नागनवाडी विरोधात दादा स्पोट्र्स संघाला पराभूत करुन आर. बी. स्पोट्र्स नागनवाडी संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धा चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केल्या होत्या. चेअरमन दयानंद काणेकर यांनी यांच्या पुढाकाराने या स्पर्धा शांततेत पार पडल्या.
चंदगड अर्बन टेनिस बॉल क्रिकेट चषक हे या वर्षीचे चौथे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये चंदगड तालुक्यासह कुडाळ, म्हापसा, डिचोली, घोडगेवाडी, आजरा, बहादुरवाडी, बेळगाव व मन्नूर अशा ३२ संघाने सहभाग घेतला होता. पहिल्या उपात्य सामन्यात पिके दादा स्पोर्ट्स चंदगड ने आर्यन स्पोर्ट्स चंदगडवर ५ विकेटने मात केली. दुसरा उपात्य सामन्यात आर. बी. स्पोर्ट्स नागणवाडीने इलेव्हन स्टार कुडाळ या संघावर २७ धावांनी मात केली आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामन्यात आर. बी. स्पोर्ट्स नागणवाडीने नाणेफेक जिंकून दादा स्पोर्ट चंदगड या संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये मर्यादित १० शतकात ७ भाग ७९ धावा केल्या. यामध्ये मुकेशने २७ धावा व रोहितने १९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आर. बी. स्पोर्ट्स नागणवाडीने ९.२ षटकात पाच बाद ८० धावा करून सामना पाच विकेटने जिंकला. या स्पर्धेमध्ये संतोष पाटील याला सामनावीर, मालकावीर म्हणून मुकेश, उत्कृष्ट फलंदाज म्हणून मनोज गावडे व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भूषण याला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेला प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होती.विजेत्यांना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, चेअरमन दयानंद काणेकर, व्हा. चेअरमन बाबू हळदणकर, संचालक सचिन बल्लाळ, अरुण पिळणकर, राजेंद्र परीट, श्री. देशमुख, श्री. सातवणेकर, श्री. गोंधळी, श्री. देसाई, उर्मिला भातकांडे, संपदा भिसे, संजय ढेरे, मारुती कुंभार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संजय चंदगडकर यांनी सुत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment